Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Dec 2022, 3:42 pm
Subscribe
तो खेळाडू म्हणजे लिओनेल आंद्रेस मेस्सी म्हणजे लिओनेल मेस्सी. मेस्सीचा जन्म रोझारियो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मेस्सीने फुटबॉल जगतात आपला ठसा कसा उमटवला ही एक रोचक अशी कहाणीच आहे
दोहा : फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे.या विजयाने लिओनेल मेस्सीचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. या विजयाचा शिल्पकार आहे लिओनेल मेस्सी. मेस्सीने स्वतःच्या बळावर संघाला चॅम्पियन बनवले. इतकेच नाही तर तब्बल ३६ वर्षानंतर अर्जेंटिनाचे स्वप्नही पूर्ण केले. हा विश्वचषक जिंकून अर्जेंटिनाने आज इतिहास रचला आहे.
२४ जून १९८७ रोजी अर्जेंटीनातील रोझारियो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात लिओनेल आंद्रेस मेस्सी म्हणजे लिओनेल मेस्सी याचा जन्म झाला.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मेस्सीने फुटबॉल जगतात आपला ठसा कसा उमटवला ही कहाणी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
लिओनेल मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत असत. तर आई क्लिनर म्हणून काम करत होती. मात्र, त्याचे वडील एका क्लबचे प्रशिक्षक देखील होते. म्हणूनच त्यांच्या घरात फुटबॉलचे वातावरण होते. अशा परिस्थितीत लिओनेल मेस्सी स्वतः वयाच्या ५ व्या वर्षी एका क्लबमध्ये सहभागी झाला.
तेथे तो या खेळाच्या मूलभूत गोष्टी शिकला. पुढे वयाच्या ८ व्या वर्षी मेस्सीने आपला क्लब बदलला आणि तो नेवेल ओल्ड बॉईज क्लबमध्ये गेला. पण काही काळाने अशी घटना घडली, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Fifa Terra Cup Final : अर्जेंटिनानं मैदान मारलं, पेनल्टी शुट आऊटमध्ये इतिहास रचला, फ्रान्सचा पराभव
मेस्सीला लहानपणीच जडला गंभीर आजार
वयाच्या ११ व्या वर्षी लिओनेल मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी नावाचा आजार जडला.
या आजारात कोणत्याही व्यक्तीची प्रगती थांबते. त्याचा हा आजार वाढत गेला असता तर त्याची वयाच्या ११ व्या वर्षी जेवढी उंची होती ती तेवढीच राहिली असती.
हा आजार झालेला असताना मेस्सीच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. दरम्यान, फुटबॉलपटू म्हणून लिओनेल मेस्सीची वाढ सुरूच होती. रिव्हर प्लेट यांनी मेस्सीला आपल्यासोबत ठेवाले असे त्याच्या कुटुंबीयांना सांगितले.
पण तो मेस्सीची महागडा औषधोपचार करण्यास मात्र असमर्थ होता. याच दरम्यान मेस्सीचे नशीब बदलले.
Nicko vella biography sampleफुटबॉल क्लब बार्सिलोना त्यावेळी खेळाडू म्हणून लहान मुलांवर लक्ष ठेवून होते. टॅलेंट हंट अंतर्गत, लहान शहरे, शाळा, महाविद्यालये आणि विविध क्लबमध्ये हे केले जात होते.
FIFA 2022 : मेस्सी नाही तर हा ठरला अर्जेंटिनाचा वर्ल्डकप विनर, जाणून घ्या त्याचं नाव
बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रझाक यांना लिओनेल मेस्सीबद्दल माहिती मिळाली.
क्लबने मेस्सीला साइन केले. यासोबतच औषधांचा आणि आजारावरील उपचारांचा संपूर्ण खर्च देण्यास क्लब तयार झाला. अट एवढीच होती की मेस्सीला अर्जेंटिना सोडून बार्सिलोनाला जावे लागेल. कुटुंबाने हे मान्य केले आणि अशा प्रकारे लिओनेल मेस्सीची व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू झाली.
२००१-२००२ चा काळ लिओनेल मेस्सीसाठी युरोपमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि क्लब हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी घालवला गेला.
परंतु त्याची बार्सिलोना-बी संघात निवड झाली. याच दरम्यान त्याने जवळजवळ प्रत्येक सामन्यात किमान एक गोल केलाच. अशात सीझनमध्ये त्याने ३० सामन्यांत एकूण ३५ गोल केले. वयाच्या १४ व्या वर्षी लिओनेल मेस्सी या संघाचा एक भाग होता आणि पुढे त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहिली. मेस्सी एका छोट्या लीगमध्ये स्वत:चे नाव करत होता. तसेच दिवसेंदिवस त्याचा खेळही उत्तमोत्तम होत होता.
साहित्य महामंडळे गप्प का?; पुरस्कार रद्द करण्यावरून लक्ष्मीकांत देशमुख यांचा साहित्यकांना सवाल
सन २००४-५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लबमध्ये पदार्पण केले.
बार्सिलोनाकडून फुटबॉल खेळणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. लिओनेल मेस्सीने १ मे २००५ रोजी वरिष्ठ संघासाठी पहिला गोल केला.तसेच लिओनेल मेस्सीने २४ जून रोजी एक वरिष्ठ खेळाडू म्हणून बार्सिलोनासोबत करार केला आणि त्यानंतर जे पुढे घडले तो संपूर्ण इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
लेखकाबद्दलसुनील तांबेसुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे.
तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा